19 July 2019 10:08 AM
अँप डाउनलोड

वर्ल्ड कप २०१९ : आज टीम इंडियाचा मुकाबला श्रीलंकेशी

वर्ल्ड कप २०१९ : आज टीम इंडियाचा मुकाबला श्रीलंकेशी

लंडन : वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. टीम इंडियाने ८ पैकी ६ सामने जिंकून सेमीफायनलचे तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. तर श्रीलंका याआधीच स्पर्धेबाहेर असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे हा सामना टीम दोनही संघांसाठी औपचारिकच असेल.

टीम इंडियाने आठपैकी ६ सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं कारण आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे या सामन्यात ते आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील. तसेच गोलंदाजीत सगळ्याच गोलानादाजांनी उत्तम कामगिरी केली आहे.

दरम्यान, श्रीलंकेला गमावण्यासाठी काहीच नाही त्यामुळे ते निर्भीड होऊन खेळतील. अनुभवाची कमतरता असलेला हा संघ याआधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(54)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या