19 July 2019 9:44 AM
अँप डाउनलोड

रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी? मनसे

रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी? मनसे

मुंबई : साध्याच युती सरकार हे अधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांना वाचवण्याच्या उद्देशाने उंदीर खेकडे यांना दोषी ठरविण्याचे हास्यास्पद प्रकार करता आणि त्यामुळे सरकारवर चोहोबाजूने टीका करण्यात येते आहे. दरम्यान गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अशातच नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राणे यांना पाठिंबा दिला आहे. “नितेश राणे यांनी केलं ते योग्यच केलं. रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार?”, असा प्रशानंही त्यांनी सरकारला विचारला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘लाखो रुपये खाऊन इंजिनिअर्सना कळणार नसेल तर त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच समजवावे लागले असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या या कृत्यावरून त्यांचे वडील नारायण यांनी ‘त्याने स्वत:साठी नाही लोकांसाठी आंदोलन केलं आहे. त्याची चूक ही आहे की त्याने आंदोलन सुरु केलं. अधिकाऱ्यावर चिखल फेकणे हे अयोग्य आहे. मी माफी मागतो”, असं म्हणत राणे यांनी माफी मागितली होती.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या