12 August 2020 3:44 PM
अँप डाउनलोड

कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप? काँग्रेसचे व जेडीएस'चे ११ आमदार फुटणार

Kumarswamy Government, JDS, BJP, Congress, karnataka, Rahul Gandhi, Yeddyurappa, B. S. Yeddyurappa, Narendra Modi, Amit Shah, Karnataka Assembly Election 2018

बंगळुरू : कर्नाटकात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण काँग्रेसचे एकूण ८ तर जेडीएसचे ३ असे मिळून तब्बल ११ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एकूण संख्याबळानुसार जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर विद्यमान सरकार अल्पमतात येऊ शकते. मागील वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली, तेव्हा पासून कर्नाटकातील भाजपचे धुरंदर सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते, मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर या हालचालींनी पुन्हा जोर धरला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १०४ जागा मिळवल्या. परंतु पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. परंतु आता सत्तेतल्या दोन पक्षांमधलेच १२ आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x