19 July 2019 9:43 AM
अँप डाउनलोड

निर्लज्ज युती सरकार! भरपाईसाठी धरणफुटीत वाहून गेलेल्या वस्तूंची बीलं दाखवा, अन्यथा!

निर्लज्ज युती सरकार! भरपाईसाठी धरणफुटीत वाहून गेलेल्या वस्तूंची बीलं दाखवा, अन्यथा!

चिपळूण : तिवरे धरणाच्या दुर्घटनेत तब्बल १९ गावकऱ्यांचा जीव गेला असून त्यांचे कुटुंबीय प्रचंड दुःखात आहेत. अनेकांचे तेर अजून शव देखील मिळालेले नाहीत. सरकारने देखील संबधित मंत्र्यांना या ठिकाणी धाडले खरे मात्र त्यांनी देखील वरचेवर गावकऱ्यांशी चर्चा करून आणि त्यानंतर सरकारी विश्राम गृहात बसून स्वतःच्या अकलेचे तारे तोडून धरण खेकड्यानी तोडल्याचा जावईशोध लावला.

सरकारकडून देखील बाधितांना सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन देखील दिलं, मात्र त्यानंतर अधिकारी कामाला असून ते गावकऱ्यांच्या दुःखात अजून तेल ओतण्याचं काम करत आहेत असंच म्हणावं लागेल. आधीच तिवरे धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत काय काय वस्तू वाहून गेल्या याची यादी धरणग्रस्तांना अधिकाऱ्यांकडून मागितली जात आहे. ते एक ग्रामीण क्षेत्र असून तेथे विकल्या जाणाऱ्या वस्तूंची पक्की बिलं मागणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल. बिनडोक अधिकाऱ्यांना हे देखील समजत नाही की केवळ वस्तूच नाही तर संपूर्ण घर आणि त्यातील सर्व लहान मोठ्या वस्तू वाहून गेल्या आहेत. प्रचंड चिखलाने भरलेला पाण्याचा झोत घरात शिरतो आणि माणसासकट घरातील सर्व वस्तू घेऊन जातो आणि त्यावेळी घरातील कागदाची चिटकूळं कशी राहतील इतकी साधी समज देखील या मूर्ख अधिकाऱ्यांना नाही असंच म्हणावं लागेल.

किंबहुना बिलं पास करण्यासाठी एकप्रकारे गैरप्रकार करण्यासाठीच हे सर्व केलं जात असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. तिवरे धरण दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. 19 जणांचा जीव गेला आहे. 3 जण अद्याप बेपत्ता आहेत. पीडितांना सरकारने सर्वोतोपरी मदतही जाहीर केल, मात्र असं असताना देखील वास्तव दुसरंच आहे. जिल्हा प्रशासनाकडून पीडितांच्या घराचा पंचनामा केला जातोय. ग्रामस्थांनी कोणकोणत्या वस्तू गमावल्या याची बील पुरावं म्हणून मागण्यात येत आहेत. ज्या लोकांनी आपली घरं गमावली त्यांनी पुरावे शोधत बसावं का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. मी स्वत: गावाला भेट देणार असून अधिकारी नेमका काय पुरावा मागत आहेत हे मी पाहणार आहे, असं चिपळूनचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगितलं आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या