2 May 2025 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

ICC Cricket T20 World Cup 2021 | T-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर

ICC T20 World Cup

मुंबई, २९ जून | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.

विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमन देशात घेण्यात येणार असल्याचे काही दिवासंपूर्वी आयसीसीने सांगितले होते. त्यानंतर आता स्पर्धा सुरु होण्याची नेमकी तारीख आय़सीसीने सांगितली असून 17 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. संपूर्ण सामने केवळ चार मैदाना खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे.

शेड्यूल कसं असणार?
पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)

यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: ICC T20 World Cup 2021 Venue And Date officially announced sports news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ICC T20 World Cup 2021(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या