15 December 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

ICC Women's T20 WC Final: भारताला नमवून ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

India vs Australia, ICC Womens T20 World Cup final, Australia won fifth T20 World Cup

मेलबर्न: आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने ८५ धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल ५ वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ९९ धावांवर ढेपाळला.

ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याशिवाय वेदा कृष्मामूर्तीने १९, रुचा घोषने १८, स्मृती मंधाना ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने चार आणि जेस जोनासनने तीन तर सोफी मोलिन्यूक्स, डेलिसा किमिंस आणि निकोला कॅरीने एक-एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. तर एलिसा हिलीने ३९ बॉलमध्ये ७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ मध्येही टी-२० विश्वचषक जिंकला होता.

 

News English Summery: India lost their final match between India and Australia by 85 runs in the ICC T20 World Cup. With this defeat, India’s dream of becoming the first world champion was broken. Australia, then, won the T20 World Cup five times. Chasing the 185-run target for Australia, the Indian team put on 99 runs. In the final game, India could not do well in batting and bowling. Australia’s 184-run stand was the result of India’s fine fielding. After that, India were hit hard in the first over. Shefali Verma was dismissed for just two runs. Shefali Verma, who was in form throughout the tournament, was the only Indian batsman. Then Tania Bhatia retired and Jemimah fell to zero. So, India’s position was 2 for 8. After that, the memory was also dismissed for 11 runs. Captain Harmanpreet Kaur, who had the highest expectations of India, could not do well in this match. Harmanpreet Kaur was dismissed for 4 runs.

 

Web News Title: Story India vs Australia ICC Womens T20 World Cup final Australia won fifth T20 World Cup Title.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x