30 April 2025 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

T20 World Cup 2021 IND Vs PAK | २४ ऑक्टोबरला भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्कंठा

T20 World Cup 2021 IND Vs PAK

मुंबई, २० ऑक्टोबर | दोन शत्रू राष्ट्र मोठा कालांतराने क्रिकेट सामन्यात समोरासमोर येणार असल्याने क्रिकेट प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यात रविवारी हा सामना खेळला जाणार असल्याने वेगळीच मजा असणार (T20 World Cup 2021 IND Vs PAK) आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजर रविवारी होणाऱ्या या सामन्यावर केंद्रित होणार आहेत.

T20 World Cup 2021 IND Vs PAK. The biggest match of the T20 World Cup will be played on October 24. India and Pakistan will meet in Dubai. The excitement of this match is huge. Many are wondering which Pakistani players will be playing against India in this match :

सध्या वन-डे किंवा टेस्ट क्रिकेट पक्षा लोकांचा कल हा झटपट म्हणजे IPL आणि T २० सारख्या सामान्याकडे अधिक झुकला आहे. दरम्यान, T 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आमनेसामने येतील. या सामन्याची उत्कंठा मोठी आहे. या सामन्यात भारताविरोधात पाकिस्तानचे कोणते खेळाडू मैदानात उतरणार आहेत, याची उत्सुकता अनेकांना आहे. 24 ऑक्टोबर म्हणजे रविवारी हा सामना दुबईत संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे एक युद्धच असते. क्रिकेटर समोरासमोर येतात, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. चाहते या उत्कृष्ठ सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू कोण आहेत ते पाहूया. कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान भारताविरुद्ध सलामीला येतील. दुसरीकडे, फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात तिघांनीही एकाच क्रमाने फलंदाजी केली होती. यानंतर अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज चौथ्या क्रमांकावर आणि शोएब मलिक पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील.

फलंदाज आसिफ अली, अष्टपैलू इमाद वसीम आणि शादाब खान फिनिशरची भूमिका साकारतील. दुसरीकडे, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी वेगवान गोलंदाजी विभागात दिसतील. पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम (कर्णधार ), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीफ रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: T20 World Cup 2021 IND Vs PAK will be played on October 24 in Dubai.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#T20Cricket(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या