27 July 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

लोकशाही धोक्यात, दिल्लीचे आर्चबिशप यांचं चर्च धर्मगुरुंना पत्र

नवी दिल्ली : देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं नमूद करत दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशभरातील सर्व चर्चच्या धर्मगुरुंना पत्र लिहून संदेश दिला आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदीं सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आल्याच बोललं जात आहे. एकूणच वर्षभरावर लोकसभा निवडणूका येऊन ठेपल्याने आणि त्यात जर सर्व कॅथलिक समाजाचा रोष व्यक्त झाला तर भाजपला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी लिहिलेल्या संबंधित पत्रात म्हटलं आहे की, संपूर्ण देशात लोकशाही धोक्यात आली असताना पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपण देशासाठी एक प्रार्थना अभियान सुरु करायला हवं, तसेच संविधानाची लोकशाही तत्त्वं व निधर्मी रचनेला धोका निर्माण करणाऱ्या प्रक्षुब्ध राजकीय वातावरणापासून देशाला वाचवायला हवं असं आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशातील चर्चच्या धर्मगुरूंना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.

तसेच देशातील ख्रिस्ती बांधवांचे हक्क व कल्याण यांची काळजी घेणारं सरकार सत्तेत यायला हवं, त्यामुळे निवडणुका व देशातील सरकार यांची आम्हाला चिंता वाटते आहे असं आर्चबिशप अनिल कोटो यांनी म्हटलं आहे.

संघाच्या नेत्यांकडून आणि भाजपच्या नेत्यांनी आर्चबिशप अनिल कोटो यांच्यावर टीका केली असून, नरेंद्र मोदी सरकारने धर्मांतरांचे उद्योग बंद केल्यामुळेच पादरींमध्ये अस्वस्थता पसरल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. आर्चबिशप अनिल कोटो यांच हे संदेश देणार पत्र म्हणजे केवळ समाजात फूट पडण्याचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे असं आरएसएस मत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x