कितीतरी स्वप्नांचे आधार झाले,
माझ्यावर वेदनांचे संस्कार झाले..
डगमगलो अगदी कोसळून पडलो,
कागदाने सावरून शब्द उभे झाले..
नव्हते फार असे सुख अन् दुःखही,
जखमांचे व्रण एवढे बोलके झाले..
बाहेर उजेड शोधत होतो सारखा,
आत उजेडाचे दिवे मंद करुन झाले..
उधार श्वास उसणे घेत राहिलो मी,
निसर्गाचे देणे असे मातीमोल झाले..
कळलं तेव्हा आयुष्य समजले होते,
गोष्ट लिहितांना मात्र मन उपरे झाले..
बंद दाराशी घुटमळत थांबलो एकदा,
कसे येणे केले आपलेच विचारते झाले..
नाही वाटलं मग पुन्हा जगावसं मला,
कागदावर मृत्यूचे दाखले लिहिते झाले..!
लेखक: पियुष खांडेकर
