23 March 2023 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार? Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल? Zomato Share Price | 65 टक्क्याने स्वस्त झालेला झोमॅटो शेअर पुन्हा 65 टक्के परतावा देणार? स्टॉक वाढीबद्दल नेमका रिपोर्ट काय?
x

Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 2 टप्प्यात मतदान

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुप चंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीये. २०१७ प्रमाणेच २०२२ मध्ये होत असलेल्या विधानसभेची निवडणुकही दोन टप्प्यात होणार आहे.

एकूण 51,782 मतदान केंद्र असून महिलांसाठी 1274 मतदान केंद्र आहे. तर दिव्यांगासाठी 182 खास मतदान केंद्र उभारले आहे. तर 142 आदर्श मतदान केंद्र आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे, 4.61 लाख तरुण मतदार असून 3.24 लाख नवे मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेबर
दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर

अर्ज छाननी
* पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर
* दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
* पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर
* दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक
* पहिला टप्पा: 1 डिसेंबर
* दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबरला मतदान

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election 2022 dates declared by election commission of India check details 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x