28 March 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 7 मल्टिबॅगर शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, 6854 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गुंतवणूकदार नेहमी अशा शेअर्सच्या शोधात असतात जो त्यांना अल्पावधीत उत्कृष्ट परतावा कमावून देऊ शकतो. आज आपण शेअर बाजारातील अशा सात शेअरची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी फक्त तीन आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर माहिती.

वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीज लिमिटेड :
या कंपनीच्या स्टॉकने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सुमारे 6854 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 774.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षांमध्ये, या कंपनीच्या शेअरचे ROE आणि वार्षिक निव्वळ नफा प्रमाण सुधारले आहेत. कंपनी शून्य प्रवर्तक तारण सह शेअर बाजारात मजबूत कामगिरी करत आहे.

प्रवेग लिमिटेड :
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने अद्भूत कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात लोकांना 4829 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.57 टक्के वाढीसह 465.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या बुक व्हॅल्युमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे. महील तीन तिमाहीपासून कंपनीचा नफा वाढत आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार आणि गुंतवणुकदार संस्था कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.

रामा स्टील ट्यूब्स :
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3451 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 27.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील दोन तिमाहीत कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ झाली आहे. कंपनी शून्य प्रवर्तक तारण कंपनी असून शेअरची बुक व्हॅल्यु सुधारली आहे.

BLS International Services :
31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह 165.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 1955 टक्के परतावा कमावून दिला आहे. बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस ही कंपनी शून्य प्रवर्तक तारण असलेली कंपनी असून कंपनीवर अल्प कर्ज आहे. मागील चार तिमाहीत कंपनीच्या महसुलात प्रत्येक तिमाहीत वाढ नोंदवली गेली आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची बुक व्हॅल्यू सुधारली आहे.

Elecon Engineering :
मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1841 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 380.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 तिमाहींपासून कंपनीचा महसूल सतत वाढत आहे. शेअरच्या बुक व्हॅल्यूमध्ये सुधारणा झाली असून कंपनी शून्य प्रवर्तक तारण आहे.

इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट :
या कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1572 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 45.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 2 वर्षांमध्ये कंपनीच्या ROE, रोख प्रवाह आणि वार्षिक निव्वळ नफ्यात सुधारणा पाहायला मिळाली आहे.

परमनंट मॅग्नेट :
या स्टॉकने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर नफा कमावून दिला आहे. तीन वर्षात स्टॉकची किंमत सुमारे 1126 टक्के वाढली आहे. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.67 टक्के वाढीसह 905.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील दोन तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. कंपनीवर फारच कमी कर्ज आहे. मागील 2 वर्षात कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्यात आणि बुक व्हॅल्यूमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | List of Multibagger Stocks check details on 1 April 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x