27 April 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

TCS & Infosys Shares | भरवशाच्या टीसीएस आणि इन्फोसिस शेअर्सची टार्गेट प्राईस पहा, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

TCS & Infosys Shares

TCS & Infosys Shares | पुढील काळात आयटी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांना मजबूत फायदा मिळू शकतो. आयटी आणि टेक उद्योगांमध्ये दीर्घकालीन सुधारणा पाहायला मिळू शकते. याचा फायदा TCS या दिग्गज कंपनीला होणार आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत उद्योगातील जोरदार रिकव्हरीचा जास्तीत जास्त फायदा TCS सारख्या दिग्गज कंपन्यांना मिळेल. म्हणून मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी TCS कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी त्यांनी शेअरची किंमत 3810 रुपये निश्चित केली होती, जी आता कमी करून 3710 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते इन्फोसिस कंपनीचे शेअर्स देखील मजबूत रिकव्हरी करु शकतात. हा स्टॉक पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून देऊ शकतो. विशेष बाब म्हणजे TCS आणि इन्फोसिस या दोन्ही आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे फंडामेंटल्स खूप मजबूत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात किमान 30 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअरची लक्ष्य किंमत 1750 रुपये निश्चित केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1,425.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

दिग्गज आयटी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. मागील एका वर्षभरात इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये 24.28 टक्के घसरण झाली आहे. तर टीसीएस कंपनीचे शेअर्स एका वर्षात 15.02 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी TCS कंपनीचे शेअर्स 3,204.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1,425.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. इन्फोसिस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1913 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1355 रुपये होती. TCS कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3835.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2926.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS & Infosys Share Price on 01 April 2023.

हॅशटॅग्स

TCS & Infosys Shares(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x