चांदणं रात्री तू समोर
हातात कॉफीचा कप,
देहाचे स्पर्श अबोल न्
तुझी नजरही गप्प-गप्प..
बोलावं तू तरी काही
अंधारातील रातराणी,
होऊन रती, निशा टाळ
मौनाची ही आणीबाणी..
कशास हवेत कारणे
एक कटाक्षही हा पूरे,
नकोत ओझे शब्दांचेही
बस, ओठ व्हावी कापरे..
चांदण टिपून आभाळ
छातीशी येऊन बिलगवा,
किती नठाळ मुल तो ही
खोडकर बोलून घ्यावा..!
लेखक: पियुष खांडेकर
