उदास मनावर उदासीनतेची पडली आहे
सावली ओठावर हसू आज येतच नाही
मनात हुंदका दाबून जागा समोर प्रयत्न करतोय
हसण्याचा सारखा, पण साल ! जमतच नाही
माझी उदासीनता न सांगताच कळली होती तिला
नेहमी प्रमाणे जरा एकांतात राहायचे होते मला
शब्दांनी न बोलताच डोळ्यांनी बोलली फक्त, जास्त
विचारात राहू नकोस वेड्या स्वप्न तुझीपण तुटली
उदास स्वप्नांची ही शीदोरी असेल नशिबी
मनच नसते ठिकाणावर तरी स्वप्न पाहायचे कसबी
पुन्हा उदासीनता झटकून पांघरून घेईल आनंदी
कुणाच्या सुखासाठी का असेना राहील सदा आनंदी
सदानंदी राहतांना क्षणिक उदास राहते मन पण
आठवणीत सदा कुणासाठी तरी झुरत राहते मन
लेखक: पियुष खांडेकर
