30 April 2025 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या

Airtel New Plans

Airtel New Plans | TRAI ने दिलेल्या सूचनानुसार एअरटेल कंपनीने 2 नवे प्रीपेड प्लॅन्स आपल्या ग्राहकांसाठी जारी केले आहेत. हे प्लॅन्स इतर प्लॅनपेक्षा थोडे वेगळे आहेत. यामध्ये तुम्हाला एसएमएस आणि व्हॉइस कॉलिंग देण्यात येणार आहे. इतर अनलिमिटेड प्लॅनप्रमाणे यामध्ये तुम्हाला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

एवढेच नाही तर तुम्हाला यामध्ये ओटीटी सारखे प्लॅटफॉर्म देखील पाहायला मिळणार नाहीत. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन नवीन प्लॅन्स खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी तयार केले आहेत.

एअरटेलचा 509 रुपयांचा प्लॅन आहे तरी काय :

एअरटेलने जारी केलेल्या 2 नवीन प्लॅनपैकी एक प्लॅन म्हणजे 509 रुपयांचा प्लॅन. या प्लॅनमध्ये तुम्हाला बोलण्यासाठी एसएमएस त्याचबरोबर व्हॉइस मेसेजेस (व्हॉइस कॉलिंग) दिले जाणार आहेत. तुम्हाला एसएमएस आणि व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड दिले जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 900 एसएमएसची सुविधा देण्यात येणार आहे.

तुम्हाला या प्लॅनच्या इतरही बेनिफिट्सबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला हॅलो ट्यूनचा ॲक्सेस दिला जाणार आहे. एवढेच नाही तर, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि एअरटेल एक्स्ट्रीम ॲप देखील देण्यात येणार आहे. 509 रुपयांचा हा प्लॅन तुम्हाला तब्बल 84 दिवसांसाठी वापरता येणार आहे.

एअरटेलचा 1,999 रुपयांचा दुसरा प्लॅन देखील आहे जबरदस्त :

1. एअरटेलचा दुसरा प्लॅन 1999 रुपयांसाठी दिला गेला आहे. हा प्लॅन अशा व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे ज्यांना दीर्घकाळासाठी रिचार्ज करायचा आहे.

2. प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला एकूण 3600 एसएमएस देण्यात आले आहेत तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली आहे.

3. एअरटेलच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला Airtel Extreme App, Apollo 24/7 Circle आणि Hello Tune या सर्व सुविधा देखील अगदी मोफत दिल्या जाणार आहेत.

4. प्लॅनच्या वैधतेबद्दल सांगायचे झाले तर 1,999 रुपयांचा प्लॅन एका वर्षाच्या कालावधीत येतो. म्हणजेच तुम्ही संपूर्ण वर्षभर 1,999 रुपयांचा रिचार्ज करू शकता.

5. हे दोन्ही प्रकारचे प्लॅन ‘एअरटेल थँक्स एप्लीकेशन’ त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुम्ही वेबसाईटवरून या प्लॅनबाबत संपूर्ण माहिती घेऊन रिचार्ज देखील करू शकता.

6. तुम्हाला या प्लॅनमध्ये केवळ एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर, डिज्नी+हॉटस्टारसह स्वस्त एअरटेल प्लॅन मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Airtel New Plans Thursday 23 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Airtel New Plans(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या