16 April 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; शत्रूचं विमान ३५०० कि.मी दूरवर हवेतच नष्ट होणार

4 ballistic missile, DRDO

नवी दिल्लीः चीनची राजधानी बीजिंग पासून पाकिस्तानचे सर्व शहरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेली स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज भारताकडून करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे. या चाचणीनंतर भारतीय लष्कर पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे.

या पाणबुडी मिसाइलला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO)नं तयार केलं आहे. या मिसाइलला भारतीय नौसेना स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत-श्रेणीच्या पाणबुडीत तैनात करणार आहे. ही मिसाइल जमिनीपासून हवेत मारा करून लक्ष्य भेदण्यात सक्षम आहे. QRSAM यंत्रणेंतर्गत कोणत्याही सैन्य अभियानांतर्गत मिसाइल गतिमान राहते. तसेच शत्रूचं विमान किंवा ड्रोनवर नजर ठेवून तात्काळ त्याला लक्ष्य बनवते.

दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराला आता सुखोईचं सुरक्षा कवच मिळणार आहे. या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही एअरक्राफ्ट कॅरियर अथवा कोणत्याही प्रकारच्या अन्य आक्रमणाला थेट सुखोईचा दणका मिळेल. या सुखोई विमानांवर २९० किलोमीटरपर्यंत मारा करणारी अत्याधुनिक ब्राम्होस क्रूझ मिसाईल्स तैनात असणार आहेत. त्यामुळे दक्षिणेकडे प्रथमच निर्माण झालेल्या सुखोई स्क्वाड्रनची मारकक्षमता वाढली आहे.

 

Web Title:  India Successfully test fired nuclear capable submarine launched super k 4 ballistic missile.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x