रेशनकार्ड धारकांनो | मेरा रेशन अँपचे फायदे माहित आहेत का? - मग नक्की वाचा

मुंबई, १२ जुलै | रेशनकार्ड धारकांसाठी भारत सरकारने ‘मेरा रेशन’ नावाचे मोबाइल अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे गरजू, गरीब कुटुंबांना रास्त मूल्य धान्य दुकान तसेच रेशनकार्डमधील त्यांची स्थिती तसेच रेशन कार्डवर उपलब्ध असलेल्या सुविधा याची संपुर्ण माहिती मिळेल. सध्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी मेरा राशन मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे, आणि ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.
आजकाल घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये स्मार्टफोन असतोच, अशा परिस्थितीत लोकांच्या मोबाईलमध्ये काही अॅप्स असावेत असा सरकार प्रयत्न करीत आहे, ज्यामध्यी आपल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचे फायदे सहज मिळू शकतील.
केंद्र सरकारने ‘वन नेशन वन राशन कार्ड’ ही योजना देखील लॉन्च केली. पण हा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी त्यासाठी एक खास मोबाईल अॅप देखील लॉन्च करण्यात आले आहे. मेरा राशन असं या अॅपचं नाव असून ते अॅन्ड्राईड युजर्ससाठी गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी मध्ये हे अॅप उपलब्ध असून हळूहळू 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे.
लॉनईन कसं कराल?
मेरा राशन अॅप मध्ये तुम्हांला आधी हे स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करावं लागणार आहे. Mera Ration (CENTRAL AEPDS TEAM) app हे अधिकृत अॅप आहे. त्यानंतर एक लॉग ईन प्रोसेस फॉलो करायची आहे. लॉग ईन करण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड नंबर किंवा राशन कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. या नंबरचा वापर करून तुम्ही लॉग ईन करू शकणार आहे. तसेच या अॅप द्वारा काही सुविधांचा देखील लाभ घेता येऊ शकतो.
मेरा राशन अॅप ची वैशिष्ट्य आणि फायदे:
मेरा राशन अॅप मध्ये ही राशन वितरणाची व्य्वस्था पारदर्शी होणार आहे. प्रामुख्याने या अॅपचा फायदा प्रवासी लोकं घेऊ शकणार आहेत. कारण आता वन नेशन वन राशन कार्ड योजना अंतर्गत राशन कार्ड धारक देशात कोणत्याही राशनच्या दुकानावरून खरेदी करू शकणार आहे. विविध ठिकाणी फिरणार्यांना जवळपासच्या राशन दुकानांची देखील माहिती मिळू शकेल. National Informatics Centre (NIC)कडून हे अॅप बनवण्यात आले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Know details about Mera Ration App benefits in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC