नवी दिल्ली, २६ मे | केंद्र सरकारच्या नवीन डिजिटल नियमांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमांना विरोध देखील होत आहे. दरम्यान, या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‍ॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे.

दरम्यान, आजपासून लागू होणाऱ्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅप दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हे नियम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा खंडित करण्यास भाग पाडतील, असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने मंगळवारी हा खटला दाखल केला आहे. या नियमांनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन अत्यावश्यक काम लागू होईल. अ‍ॅपवर विशिष्ट संदेश कोठून आला हे व्हॉट्सअ‍ॅपला सांगावे लागेल.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेंटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

 

News English Summary: WhatsApp has filed a petition in the Delhi High Court against the rules applicable from today. WhatsApp said the rules would violate the security of users’ privacy. The Facebook-owned company filed the lawsuit on Tuesday.

News English Title: WhatsApp has filed a petition in the Delhi High Court against the rules applicable from today news updates.

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीविरोधात WhatsApp उच्च न्यायालयात