27 November 2022 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 28 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे?
x

YouTube Ads Policy | युट्युबवर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी कम्पलसरी 5 जाहिराती पाहाव्या लागू शकतात, नव्या जाहिरात पॉलिसीवर काम सुरू

Youtube

YouTube Ads Policy | सोशल मीडिया यूजरसाठी एक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये Google च्या मालकीच्या असलेले व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube वर व्हिडिओ पाहण्यापूर्वी, अनस्किपेबल 5 जाहिराती चालू होणार असल्याचे समोर येत आहे. या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube सध्या या वैशिष्ट्याची चाचणी करत आहे तसेच ते लवकरात लवकर प्रत्यक्षात येणार आहे.

युजर्स नाराज :
सध्या YouTube प्रत्येक व्हिडीओमागे 2 अनस्किपेबल जाहिराती दाखवत आहे. आता असे समोर येत आहे की, 2 च्या जागी 5 जाहिरातींचा यामध्ये समावेश असणार आहे. याबाबत युजर्सनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यूट्यूब जाहिरातींबाबत विधान समोर :
युजर्सनी लाँग अॅड्सवर ट्विट केल्यानंतर यूट्यूबने ट्विट करत सर्व व्हिडीओजसोबत असं होणार नाही आणि जाहिराती फार लांबणार नाहीत, असं म्हटलं आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने याची पुष्टी केली आहे की प्रत्येक जाहिरात केवळ ६ सेकंदांची असेल आणि त्यापेक्षा जास्त नाही. मुळात हे सूचित करते की जर 5 जाहिराती असतील तर एखाद्या व्यक्तीला यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे सुरू ठेवण्यासाठी सुमारे 30 सेकंद प्रतीक्षा करावी लागेल. नव्या जाहिरात धोरणाबाबत अनेक युजर्सनी ट्विट केले आहे. कंपनीने ट्विटला उत्तर देत म्हटले आहे की, या नव्या जाहिरात फॉरमॅटला बंपर एडस् असे म्हटले आहे. ते फक्त 6 सेकंद आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Youtube Ads Policy tests 5 Unskipable Ads checks details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#YouTube(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x