23 April 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

हसमुखच्या मर्सिडीजच्या अपघातात एका निरपराध महिलेचा मृत्य झाला होता; नंतर जामिनावर सुटला

Hasmukh Shah, MNS, Builder, MNS Avinash Jadhav, Rahul Paithankar, Thane Nawpada Vishnunagar

ठाणे: कालच ठाणे शहरातील गाजलेलं प्रकरण म्हणजे हसमुख शहा या गुजराती व्यक्तीला मनसेने दिलेला चोप. राहुल पैठणकर नावाच्या व्यक्तीला शुल्लक कारणावरून हसमुख शाहा आणि त्याच्या मुलाने अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली होती. त्यानंतर तब्बल ५ दिवस त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रकरण मनसेकडे गेले होते. दरम्यान, राहुल पैठणकर यांनी दिलेल्या माहितीवरून मनसेने हसमुख शाहा याला शोधून काढला आणि चोप देत जाहीर माफी मागायला लावली होते.

मात्र शुल्लक कारणावरून राहुल पैठणकर यांना मारहाण करणारा हसमुख शहा हा मुळातच निर्दयी मनाचा असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याने घोडबंदर रोडवर निष्काळजीपणे गाडी चालवताना दोघांना जखमी केलं होतं. दरम्यान रिक्षाला ठोकल्यानंतर पळून जाण्याच्या नादात त्याने बाजूला उभ्या असलेल्या वंदना भगत या महिलेला स्वतःच्या मर्सिडीजने उडवलं आणि नंतर इस्पितळात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर हसमुख शाहा विरुद्ध कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली होती. मात्र नंतर तो जामिनावर सुटला होता. बांधकाम व्यावसायिक असलेला हसमुख शहा अत्यंत उद्दाम स्वभावाचा असल्याचं अनेकांनी सांगितलं. त्याच्या एकूण वागण्यात नेहमीच उन्माद जाणवतो असं अनेकांनी अनुभवलं असून, सध्या मनसेच्या चोप सत्कारानंतर तरी त्याचं डोकं ठिकाणावर येईल असं आजू बाजूच्या लोकांनी मत व्यक्त केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या