12 December 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

प्रदीप शर्मां शिवसेनेकडून आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार?

MLA Kshitij Thakur, Encounter Specialist Pradip Sharma, Maharashtra Assembly Election 2019, Nalasopara constituency

मुंबई: प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता राज्याच्या गृह विभागाने राजीनामा मंजूर केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या वसई-विरार भागातील ठाकूर कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे.

दरम्यान, १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस स्टेशन वगळता आपला बहुसंख्य काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पुन्हा ते पोलीस सेवेत परतले होते. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते.

लखनभय्या प्रकरणात २१ आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. एकटे शर्मा निर्दोष ठरले होते. या निकालाविरोधात अ‍ॅड. गुप्ता यांच्यासह राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले. २०१५मध्ये उच्च न्यायालयाने ते दाखल करून घेतले. या अपील याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत शर्मा यांना निवृत्तिवेतन मिळणार नाही, असे या पत्रात नमूद आहे.

शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. शर्मा यांच्यावर शेकलेले किंवा अजूनही न्यायालयीन टांगती तलवार असलेले लखनभय्या प्रकरण पाठ सोडणार नाही असेच दिसते. कारण शर्मा यांना उमेदवारी मिळणार असेल तर राजकीय व्यासपीठावरही त्यांचा विरोध करेन. त्यांचे खरे रूप मतदारांसमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अ‍ॅड. गुप्तायांनी स्पष्ट केले. साथ देणाऱ्या साथीदार, सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे शर्मा सर्वसामान्य मतदारांचे आणि नागरिकांचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पालघर, विरार, वसई आणि नालासोपारा पट्यात मोठी ताकद असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या मुळावर घाव घालण्याची योजना शिवसेना सध्या आखात आहे. लोकसभा निवडणुकीत पालघरच्या जागेवर विजय प्राप्त केल्यावर शिवसेनेचा आत्मविश्वास अजुन दुणावला आहे. सध्या बहुजन विकास आघाडीकडे याच पट्ट्यात एकूण ३ आमदार आहेत आणि महत्वाच्या महानगपालिका आणि नगरपालिका हातात आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर आणि मुलगा क्षितिज ठाकूर दोन सदस्य तर घरातीलच असून इथेही घराणेशाहीमुळे अंतर्गत नाराजांची फौज सध्या शिवसेनेच्या रडारवर आहे.

बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना आधीच शिवबंधन बांधले आहे. विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून निवडून आले होते. त्यांना २०१४ साली टक्कर देणारे कमलाकर वळवी हे आधीच शिवसेनेत आहेत. त्यावेळी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. शिवाय तेव्हा भाजपमध्ये असणारे जगदीश धुडी हे आता शिवसेनेत असून ते ही इच्छुक आहेत. या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोपा आहे. म्हणून तरे शिवबंधन बांधण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे आता आमदार हितेंद्र ठाकूर हे पिता पुत्र शिवसेनेच्या रडारवर असून नालासोपाऱ्याचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांना काही करून पराभूत करण्याची योजना शिवसेनेच्या नैतृत्वाने आखली आहे. आधीच एक आमदार फुटला असून, लोकसभा निवडणुकीत शिट्टी हे निवडणूक चिन्ह गमवावं लागल्याने बहुजन विकास आघाडी पेचात सापडली आहे.

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(11)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x