ठाणे: ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने बंदी असलेले वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मेघना देवगडकर असे या महिला नृत्यांगनेचं नाव आहे. ती जिम ट्रेनर म्हणूनही काम करत होती. तिने बंदी असलेले औषध डिनिट्रोफेनॉल घेतले त्यानंतर १५ तासांच्या आत तिच्या मृत्यू झाल्याचे समोर आले होतं. सोमवारी मेघना देवगडकर एका जीममध्ये वर्कआऊट करण्यापूर्वी गोळी घेतली होती. या ठिकाणी काही काळापूर्वी तीने ट्रेनर म्हणून नोकरी जॉईन केली होती.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र हेच उपाय आपल्या जीवावर बेततात. अशाप्रकरणाची घटना ठाण्यात घडली होती. तिने वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्यामुळे काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मेघना देवगडकरचा मृत अशा गोळ्याच्या सेवनामुळे झाला ज्या गोळ्या विक्रीवर आणि सेवनावर बंदी घातली होती. त्याच गोळ्याचे सेवन मेघनाने केलं होत असं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आलं होतं.

बंदी घातलेल्या गोळया घेतल्यानंतर मेघनाला हायपरथरमियाचा त्रास सुरु झाला होता. तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले होते. रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. एफडीएला अहवाल पाठवण्यात आला आहे. मेघनाला बंदी घातलेल्या गोळया कशा मिळाल्या त्या अंगाने आता पुढील तपास सुरु आहे.

मात्र बेजबाबदार पणे बंदी असलेल्या प्राणघातक औषंधाची खुलेआम ऑनलाईन विक्री होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी मोहीम उघडली असून त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. योग्य वेळी पाऊल न उचलल्यास असे अनेक सामान्य लोकं मृत्यूच्या खाईत ढकलले जातील अशी शक्यता असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळीच कार्यरत झाली आहे. त्यामुळे अशा औषध विक्रेत्यांवर एफडीए नेमकी कोणती कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.

 

Web Title: thane dancer Meghana Devgadkar dies hours after taking banned weight loss pill MNS started mission against online sales.

मेघना देवगडकर मृत्यू: बंदी घातलेल्या औषधांची ऑनलाईन विक्री; मनसे विद्यार्थी सेना आक्रमक