21 November 2019 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी

Shivsena Ramesh Mhatre, MNS Raju Patil, Kalyan Gramin Vidhansabha Election 2019

कल्याण: मनसेच्या हाती सकाळपासून निराशा आल्याचं चित्र असताना अखेरच्या क्षणी मनसेचा एक उमेदवार जिंकल्याचं वृत्त आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू रतन पाटील यांनी एकूण ८६,२३३ मतं घेत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मनसेने मोठ्या प्रमाणावर मतं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव यांना एकूण ७२,४३१ मतं पडली तर मुंबई भांडुप मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप जळगावकर यांना ४२,७५० मत पडली असून हेच चित्र अनेक मतदार संघात मनसेच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे एंक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी दोन नंबरची मतं घेतल्याचे दिसत असून त्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत होईल असं प्राथमिक चित्र आहे.

मनसेला पडलेल्या एकूण मतांची आकडेवारी लवकरच जाहीर होईल आणि त्यानंतर एकूण विश्लेषण करणं शक्य होणार आहे. त्यामुळे अजून शेवटच्या क्षणापर्यंत अनेक पक्षांची आकडेवारी बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(476)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या