2 May 2025 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

फडणवीसांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांचं धक्कादायक विधान, म्हणाले 'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'

Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj | महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये स्पर्धाच रंगली आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदीं, मंगलप्रभात लोढा यांच्यापाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनीही संतापजनक विधान केले आहे. शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य लाड यांनी केलं आहे. लाड यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले”. असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या आयोजनाची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली. यावेळी प्रविण दरेकरही उपस्थित होते. प्रसाद लाड म्हणाले, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी, असं तु्म्ही विचाराल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात हा झाला”, असं विधान प्रसाद लाड यांनी केलं. प्रसाद लाड पुढे म्हणाले, “रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरूवात कोकणातून झाली”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला सल्ला
प्रसाद लाड यांच्या विधानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसनं शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला उपरोधिक सल्ला दिलाय. “भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या”, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय.

प्रसाद लाड जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. भाजप आणि आरएसएसची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chhatrapati Shivaji Maharaj born in Konkan said BJP MLA Prasad Lad check details on 04 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chhatrapati Shivaji Maharaj(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या