12 December 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

सर्वव्यापक बैठका न घेता संभाजीराजे रात्रीच्या अंधारात बैठक घेतात, त्यांनी मराठा संघटनांचं नेतृत्व करू नये - मराठा क्रांती मोर्चा

Maratha Kranti Morcha

Maratha Kranti Morcha | छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला नकोय, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कोणाचंच नेतृत्व नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, अशी स्पष्टोक्ती मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शुक्रवारी या मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली.

मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी प्रचंड नाराज :
याप्रसंगी गुरुवारी राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीराजेंवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडणाऱ्या संघटनांमध्येच मोठी फूट पडल्याचे पुढे आले आहे.

बैठकीत कुणीही बोलू नका असा आधीच दम भरला :
औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनातर्फे गुरुवारी एक बैठक बोलावली होती. मुंबईत झालेल्या या बैठकीत औरंगाबादमधून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वतः भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आमि वेताळ यांना बैठकीमध्ये प्रवेशच देण्यात आला नाही. बैठक सुरु होण्याच्या आधीच छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असे सांगितले.

प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न :
संभाजीराजे यांनी बैठकीत इतर संघटनांचा आणि प्रतिनिधींचा अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात आला. या या पत्रकार परिषदेत रवींद्र काळे,चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, पंढरीनाथ गोडसे, शैलेश भिसे, सुरेश वाकडे, अरुण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदी मराठा नेत्यांची उपस्थिती होती.

सर्व व्यापक बैठका न घेता रात्रीच्या अंधारात बैठक घेतात :
छत्रपती संभाजीराजे सर्वव्यापक बैठका घेत नाहीत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला. ते म्हणाले, ‘ नेतृत्व सर्वसमावेशक असलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पहिल्यापासून सगळे एकत्र होते. कालच्या बैठकीत एकही माणूस नव्हता. आमचं कुणीही नेतृत्व नाही. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारात घेता. सर्व व्यापक बैठका का घेत नाहीत? सर्वांना का बोलवत नाहीत? मोजक्या चेहऱ्यांसमोर काय चर्चा चालवली आहे? छत्रपती संभाजीनगरातून तो सुरु झालंय.. मराठा नेत्यांचा वारंवार अपमान होत असेल, त्यावर तुम्ही राजकीय पोळ्या भाजत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल… छत्रपती संभाजीराजेंच्या आजूबाजूची जी मंडळी आहेत, त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हा डाव रचला जात आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maratha Kranti Morcha leaders allegations on Chattrapati Sambhajiraje check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x