14 April 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीच्या दिशेने, टॉप ब्रोकिंगने पुढच्या टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले? Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का?
x

Video Viral | नजरचुक झाली आणि मुंबई लोकल ट्रेनने तरुणाचा घात केला, अपघाती मृत्यू CCTV कॅमेऱ्यात कैद

Train In Mumbra

Video Viral | आज पर्यंत आपण अनेकदा ऐकले असेल किंवा काही जणांनी पाहिले सुद्धा असेल की, रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत झालेला मृत्यू. काही टेन्शनमुळे तर काही जण नकळत ट्रेन खाली मृत्यू मुखी पावतात. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर ही घटना 21 सप्टेंबर बुधवारची गोष्ट आहे.

तरुणाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू
महाराष्ट्रातील धुळे येथे राहणारा रामेश्वर देवरे हा मुंब्रा स्थानकावरती उभा होता तेव्हा अचानक काही कामानिमित्त तो प्लॅटफॉर्मच्या बाजूला जाऊन बसला, तेव्हा प्लॅटफॉर्मवर भरधाव वेगात आलेल्या गाडीने त्याला धडक दिली. टक्कर इतकी वेगवान होती की, तरुण गोल गोल फिरत दहा मीटर अंतरावर असलेल्या फलाटावर पडला. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मळमळ होत होती मात्र
तपासाअंती सरकारी रेल्वे पोलिसांनी सांगितले की, मृताला मळमळ होत होती म्हणून तो उलट्या करण्यासाठी फलाटाच्या बाजूला गेला होता आणि यादरम्यान पलीकडून वेगवान लोकल येत होती ज्याकडे त्याचे लक्ष नव्हते. या अपघातात अवघ्या तीन ते चार सेकंदांचा अवधी असल्याचे सांगण्यात येत असून, ट्रेन वेगात धडक देऊन निघून गेली. तो तरुण दूर पडला तेव्हा लोकांना काही समजले नाही मात्र काही वेळानंतर त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

धुळ्यातील वडजई गावात राहणारा देवरे हा त्याची मोठी बहीण, लहान भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होता तर अत्यंत साध्या कुटुंबातील देवरे हे सरकारी नोकरीच्या तयारीत होते आणि त्यासाठी ते अग्निपथ योजनेची माहिती गोळा करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Train in Mumbra Shocking accident video trending on social media checks details 24 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x