6 May 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | सेल्यूट तुझ्या मैत्रीला! भल्या मोठ्या ट्रकची ट्रॉली कोसळली आणि मित्राच्या चतुराईने वाचला जीव.. VIDEO व्हायरल

Viral Video

Viral Video | अपघाताच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक मंडळी आपल्या धुंदीत फार विचित्र पद्धतीने वाहने चालवतात. त्यांच्या निषकाळजीपनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अशातही काही अपघातांमध्ये करेक्ट टायमिंग जुळवत काही व्यक्ती अशा जीवघेण्या अपघातातून वाचतात. सध्या अपघाताचा असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. (Video Trending on social Media)

मृत्यू कधी कसा येईल हे कोणालाही माहीत नसते. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर न घाबरता मात करता येणे देखील महत्वाचे आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका मित्राने मोठ्या हुशारीने आणि चतुराईने त्याच्या मित्राचे प्राण वाचवल्याचे दिसत आहे. दोन तरुण रस्त्याने चालत जात असतात. त्यावेळी होणाऱ्या अपघातामधून एक तरुण दुसऱ्या तरुणाला वाचवतो.

व्हिडिओमध्ये वाहन चालकांची चूक असल्याचे समजत आहे. यामध्ये दोन्ही तरुण रस्त्याच्या कडेने चालत आहेत. यावेळी रस्त्यावर वेगाने वाहने देखील जाताना दिसतात. अशात एका मोठ्या वाहनाची ट्रॉली अचानक रस्त्यावर पडते. यावेळी एक तरुण अगदीच त्या ट्रॉली शेजारी असतो. मित्राच्या अंगावर ट्रॉली पडणार असल्याचे समजताच हा तरुण त्याला मागे खेचतो.

जर या तरुणाच्या अंगावर ही ट्रॉली पडली असती तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. मात्र मित्राने दाखवलेली चतुराई पाहून सगळेच चकित झाले आहेत. घटना घडते त्यावेळी दोन्ही मित्र एकत्र चालत असतात. मोठा ट्रक पडताना पाहून हा तरुण स्वतःचा जीव वाचवून पळू शकला असता. मात्र आपल्या मित्राला संकटात सोडून त्याने असं केलं नाही. त्याने मित्राचा देखील जीव वाचवला. ही संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा हा व्हिडिओ एका ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Dumper accident trending on social media check details on 02 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या