18 January 2025 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि....

Highlights:

  • Viral Video 
  • घटना नोआपारा मेट्रो स्थानकातील
  • व्हिडिओ पोस्ट मध्ये नेमकं काय?
Viral Video

Viral Video | कोलकात्यात एका जोडप्याने मेट्रोसमोर उडी मारल्याची घटना घडली आहे. आत्महत्येच्या इराद्याने या दाम्पत्याने उडी मारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावर परिणाम झाला. या घटनेमुळे स्टेशनवर बरीच खळबळ उडाली. मात्र, काही प्रयत्नांनंतर दोघांनाही तेथून हटवून मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली. ही घटना शनिवारी घडल्याचं उघडकीस येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

घटना नोआपारा मेट्रो स्थानकातील

ही घटना सायंकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी नोआपारा स्थानकात घडली. मात्र, या जोडप्याने मेट्रोसमोर उडी मारताच तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ दोघांनाही तेथून हटवले. त्यामुळे काही काळ सेवेवर परिणाम झाला होता. त्यानंतर सायंकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी कवीसभा ते दक्षिणेश्वर ही संपूर्ण फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.

या घटनेचा व्हिडिओ एका ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. दाम्पत्याने उडी मारल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक लावल्याचे दिसून येत आहे. मात्र संबंधित पुरुषाने हा एकतर्फी प्रयन्त करून महिलेला देखील आत्महत्या करण्यासाठी ओढल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

व्हिडिओ पोस्ट मध्ये नेमकं काय?

व्हिडिओ पोस्ट करताना युजरने लिहिले आहे की, प्रेमी-युगलाने ट्रेनसमोर उडी मारली. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 1,35,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय 1500 हून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने म्हटले की ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे… मुलीने तसं काहीही केलं नसल्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याने त्या प्रियकराणे हा प्रकार एकतर्फी प्रेमातून केला असावा असं देखील अनेकजण प्रतिक्रिया देतं आहेत.

News Title : Viral Video Kolkata couple jumps in front of Metro trending on social media check details on 05 June 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x