14 April 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

Viral Video | शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजीती, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Viral Video

Viral Video | अनेकदा आपण सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आहेत. कधी सिंह तर कधी चित्ता, तर कधी वाघ, आणि कधी कधी माकडाने केलेली फजेती. रोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होतात आणि व्हायरल होतात. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे की, माकडाने वाघ, सिंह किंवा चित्त्याची फजीती केली आहे.

माकडाने वाघाला मागे पळवले
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माकड आणि वाघाचा आहे. ज्यामध्ये माकडाने वाघाची चांगलीच फजीती केली आहे. तुम्ही जर व्हिडीओ पाहिला तर लक्षात येईल की, माकडाने अक्षरश: वाघासोबत मस्ती केली आहे. माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू शकतो मात्र वाघ नाही आणि हीच गोष्ट वाघाला दुखवते.

वाघाला माकडाने फसवले
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड झाडावर बसलेले दिसून येत आहे आणि एक वाघ त्याची शिकार करण्यासाठी झाडावर चढतो. वाघाला आपल्या दिशेने येताना पाहून माकड एका कमकुवत डहाळीला धरून लटकले तर वाघही तीच डहाळी पकडण्यासाठी पुढे सरकतो. संधी पाहून माकड दुसऱ्या फांदीवर उडी मारते आणि वाघ तिथेच अडकतो. थोड्या वेळानंतर वाघ झाडावरून खाली पडतो.

इंटरनेटवर व्हिडीओने घातला धुमाकूळ
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे तसेच या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘परिस्थितीचा बळी.’ व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही माकडाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटेल. दरम्यान, हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Money Vs Tiger video trending on social media checks details 02 October 2022.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x