12 October 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना, क्रीडा विद्यापीठ, स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन यंत्रणा; अमित यांचा ठराव

Maha Adhiveshan, Amit raj Thackeray, Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.

दरम्यान, आज मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेते पदी निवड करण्याचा ठराव मांडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्याकडे पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल झाला आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यतील स्वतःच्या व्हिजन बद्दल देखील मंचावर बोलताना थोडक्यात मांडणी केली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षण ठराव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. परवडणारी आणि गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत शिक्षण ठराव मांडला आहे.

त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा मानस यावेळी अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आणि भविष्यातील वाटचालीबद्दल प्रस्ताव मांडताना सूतोवाच केल्याचं दिसलं. त्यामुळे भविष्यात विद्यार्थीसाठी जमिनीवर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने काही तरी मोठं करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचं अनावरण झालं आहे आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

 

Web Title:  MNS Leader Amit Thackeray announced his vision in Maha Adhiveshan.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x