Vastu Shastra Tips | तुमच्या घरात आहेत का 'या' गूड लक गोष्टी? - नक्की वाचा
मुंबई, ३० सप्टेंबर | जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण लक्ष देत नाही, तर अशा काही घरातील गुड लक गोष्टींमद्धे अचानक बदल केल्याने आपल्या आयुष्यात बदल येऊ लागतात. वास्तु विज्ञानात (Vastu Shastra Tips) असे सांगितले गेले आहे की जर तुम्ही काही उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात सुटकरा मिळू शकतो.
There are some things in life that you don’t pay attention to, but a sudden change in some of the good luck things in the house starts to change your life. In Vastu Shastra Tips it is said that if you take some measures you can get rid of your problems to a great extent :
१) धातूचे कासव :
चांदी,कांस्य अथवा क्रिस्टल, पितळ या धातुपासून बनविलेले कासव घरात ठेवल्याने घरात सखु शांती आणि सौभाग्याचा वावर राहतो, असे म्हंटले जाते.
हिंदू धर्मा मध्ये घरात असे कासव ठेवणे हे शुभदायक मानले जाते. परंतु यासाठी हे कासव केवळ चांदी,कांस्य, क्रिस्टल अथवा पितळ यांपासूनच बनलेले असावे, माती किवा अन्य धातूचे कासव आणणे टाळावे.
हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार श्री विष्णू देव यांनी समुद्र मंथनच्या वेळी कासावाचे रूप धारण केले होते. आणि स्वतःच्या त्या कासव रुपात असताना त्यांनी त्यांच्या कवचावर मंद्राचल पर्वत सांभाळून घेतले होते. जिथे श्री विष्णू ,तिथे देवी लक्ष्मीचा वास हा असतोच. जरी घरात किंवा ऑफिस मध्ये कासव ठेवणे शुभदायक असले, तरी यात काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
क्रिस्टल पासून निर्मित असे कासव नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेतच ठेवावा. तर इतर धातूंचे कासव नेहमी पाण्यात ठेवाव. तसेच कासव धातूच्या भांड्यात पाणी भरुन ठेवाव , ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी, शांती नांदेल.
२) स्वस्तिक:
असे मानले जाते की घरात स्वस्तिक असेल तर, घरातील वास्तुदोष हा दूर होतो. तसेच याने घरात समृध्दी राहते. देवी लक्ष्मी हिस प्रसन्न करण्याकरता , घरातील पूर्व दिशेस स्वस्तिक लावावे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर कठीण प्रसंगांना सामोरे जात असाल, तर तुमच्या घरातील दरवाज्यावर पंचधातू पासून तयार असे स्वस्ति क लावावे. त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवतेची पूजा करताना जर त्यांच्या आसनेसाठी एखादी खास जागा असेल तर तिथे वर आधी स्वस्तिक चिन्ह काढण्यास वि सरू नये.
३) ओम चिन्ह :
घरात ओम (ओम) चे चिन्ह ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. घरात ओमचे चिन्ह ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव नसतो आणि घरात सुखसमृद्धी नांदते.
४) मोरपंख :
काही ठिकाणी अशी मान्यता आहे की जर तुमच्या घरात मोरपंख असेल, तर तुमच्या घरात वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. धार्मिक कथांनुसार पाहावयास गेले तर आपणास दिसून येतेकी, श्री देव गणेश, देव कार्तिकेय,श्रीकृष्ण, देवी सरस्वती, यां सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोरपंख प्रिय आहे.
ज्यांच्या कुंडलीत राहुदोष आहे, अशा व्यक्तींनी घरात मोरपखं ठेवणे चांगले मानतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरी मोरपंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. आणि घरात सुख शांती येते.
५) घोड्याची नाल :
घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लावणे शुभ मानले जाते. नाल चे तोंड खालच्या बाजूला असणे आवश्यक आहे. असे मानले जाते की यामुळे वाईट शक्तिपासून सरक्षण होते आणि घरात राहणार्या माणसांची भरभराट होते.
६) पोपटाचे चित्र किंवा मूर्तीः
वास्तुशात्रानुसार जर तुमच्या घरात मुलांना अभ्यासमध्ये मन लागत नसेल तर उत्तर दिशेला एक पोपटाचे चित्र लावा. पोपट हे प्रेम, निष्ठा, दीर्घ आयुष्य आणि शुभेच्छा यांचे प्रतीक आहे. चुकूनही घरात पोपट पाळू नये, यामुळे घरात दारिद्र्य येते.
७) कलश :
घरात कलश ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे घरातील वास्तू दोष दूर करून घरात आनंद आणि समृद्धी येते. घरात मंदिरात कलश बसवावा. यासाठी भांड्यात पाणी भरून त्यात आंब्याची पाने घालून त्यात नारळ ठेवावा. भांड्यातही स्वस्तिक चिन्ह असावे. त्यानंतर नारळावरही फुले अर्पण करावी. ज्याच्या घरात असे कलश असेल त्याच्या घरात कधीही पैसे आणि अन्नाची कमतरता नसते.
महत्वाची टीप: आम्ही वर दिलेली माहि ती सामाजि क आणि धार्मि क मान्यतेच्या आधारावर अवलंबून आहे. यामागे आमचा कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
Vastu Tips Title: Vastu Shastra Tips to bring health and wealth at home.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News