15 December 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

भारत बंद | मोदी सरकार बिथरलं? | मुख्यमंत्री केजरीवाल नजरकैदे | आपचा दावा

Delhi CM Arvind Kejriwal, New Agriculture Law, Farmers Protest, Bharat Bandh

नवी दिल्ली, ८ डिसेंबर: केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर काल सिंधू बॉर्डरवर जात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकार शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव आखत होतं. पण आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा केजरीवाल यांनी दिला आहे.

 

News English Summary: Farmers who have been protesting on the Delhi border for the last 12 days have today called for an India Bandh. His call is getting response from all over the country. The Aam Aadmi Party along with the Congress has supported the farmers’ movement. Delhi Chief Minister Arvind Kejriwal had met the protesting farmers yesterday. After that, it is learned that Kejriwal was kept in custody today.

News English Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal had met the protesting farmers now kept in custody today news updates.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x