अहमदाबाद : एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील वातावरण तापलं आहे. या घटने नंतर गुजराती समाज उत्तर भारतीयांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत असून, काल गुरुवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बिहारचा रहिवासी असल्याने आंदोलकांकडून एकूणच उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात भर म्हणजे त्यांना थेट गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्याच दिवशी गावातील रवींद्र गांडे या बिहारी कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

२८ सेप्टेंबरची ही घटना असल्याचे वृत्त असून एका बिहारी मजुराने १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलन पटलं असून लोक रस्त्यावर उतरल्याचे समजते. घटनेची खात्री पटल्यानंतर उत्तर भारतीयांवर हल्ल्याच्या घटना सुद्धा घडण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी गुजरात पोलिसांनी उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आल्यामुळे २ गुन्हे दाखल केले आहेत.

केदारनाथ नावाच्या २३ वर्षांचा उत्तर भारतीय ऑटोरिक्षा ड्रायव्हरवर तब्बल २५ जणांच्या जमावाने चांदलोडिया पुलावर तुफान हल्ला केला होता. तसेच बाहेरच्या लोकांनी आता गुजरात सोडावे, गुजराती जनतेला वाचवण्याची गरज आहे, अशा घोषणा तो जमाव देत होता, अशी माहिती खुद्द केदारनाथ यानेच पोलिसांना दिली आहे. तसेच साबरमती येथे स्कीन एक्स्पर्ट्सचे काम करणाऱ्या एका महिलेचा चक्क पाठलाग करून तिला धमकावण्यात आल्याचा प्रकार सुद्धा त्या घटनेनंतर घडला आहे. प्रतिमा कोरी असे धमकी देण्यात आलेल्या त्या महिलेचे नाव असून, ४ स्थानिक लोकांनी तिला अडवले. तसेच तिचा पाठलाग करून तिला शिविगाळ केली. यूपी, बिहारमधील लोकांनी गुजरात सोडून जावे, नाहीतर त्यांना ठार मारण्यात येईल, अशी धमकीही जमावाने दिली. दरम्यान या प्रकाराची तक्रार प्रतिमा यांनी स्वतः स्थानिक पोलिसांकडे केली असून त्या अत्यंत दहशदीखाली जगत आहेत.

दरम्यान, अहमदाबादमधील मेघनीनगर येथेसुद्धा आंदोलनादरम्यान ठाकोर समुदायाने परप्रांतियांवर कारवाई करण्याची मागणी केली. मेहसाणा जिह्ल्यातील नंदसन आणि काडी येथेही उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रसार माध्यम अजून यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत नसून सध्या निवडणुका जवळ असल्याने यावर मौन बाळगण्यात येत आहे का असा प्रश्न सामान्य लोकं उपस्थित करत आहेत.

after rape on 14 year girl the local peoples says north indians to leave gujarat