14 May 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेनेची सामना'तून फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई : शिवसेना आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सध्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचे सुद्धा अधोरेखित केले आहे. राज्यातील पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा तर पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर २ दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतली आहे.

त्यामुळे ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरण्यात येत आहे. तसेच ढासळलेल्या परिस्थितीवर शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखात्यावर अकार्यक्षम म्हणून ठपका ठेवला आहे. शहरात पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यामुळेच मुंबई आतापर्यंत सुरक्षित राहिली होती. परंतु मागील २-४ वर्षांत मुंबईची अधिक वाट लागली आहे. सर्वच बाजूने मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व शहराची वाट लावण्यासाठीच आहेत असा वार सामनातून करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आपल्या पोलिसांना लगेच समजते, इतकेच नाही तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ‘बॉम्ब’ ठेवल्याची माहिती सुद्धा झटपट मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घातल्या जाणार आहेत हे पोलिसांना कसे कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबई शहरात सध्या ‘मेट्रो’ची मोठ्याप्रमाणावर कामे काढली आहेत. दरम्यान, त्यासाठी सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांनी दावा केला आहे अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x