मुंबई : शिवसेनेच्या एकाला चलोरेच्या भूमिकेमुळे भाजपने आता सेनेवर युतीबाबत दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तसेच लवकरात लवकर युतीबाबत कळवलं नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्रच सामोरे जाण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सज्जड दमच शिवसेना देण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पडद्याआड युतीची निर्णयाबाबत जोरदार खलबतं सुरु झाल्याचं वृत्त आहे. त्यानुसार भाजपने युतीच्या निर्णयासाठी शिवसेनेवर दबाव वाढवला असून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे कळवले आहे. दरम्यान, शिवसेना यावर सध्या काहीच बोलण्यास तयार नसून आम्हाला कसलाही अल्टिमेटम मिळालेला नाही असं सांगितलं आहे. परंतु भाजपने एक मोठा बॉम्ब या अल्टिमेटम मार्फत टाकल्याचे बोलले जात असून शिवसेना त्यामुळे गोंधळलेल्या स्थितीत आहे, असं म्हटलं जात आहे.
तुम्ही एकत्र येऊन निवडणुका लढविण्याचा निर्णय न घेतल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढविण्यास तयार रहा, असा संदेश दिला आहे असं प्रसार माध्यमांकडे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे शिवसेनेत सुद्धा या साठी बैठकांचे सत्र सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		