मुंबई : मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठी मेट्रो-३च्या आरे कारशेडचा न्यायालयीन मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कार डेपो उभारण्यास आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फेटाळली आहे. न्या.एस सी धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाकडून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

‘आरे कॉलनीतील जमीन पूर्वी ‘ना विकास’ क्षेत्र असतानाही मनमानी पद्धतीने अधिसूचना काढत या परिसरातील प्रजापूर व वैरावली या गावांतील सुमारे २५ हेक्टर जमीन वगळून ती ‘मेट्रो कारशेड’साठी राखीव करण्यात आली, असा आरोप करत पर्यावरणप्रेमी अमृता भट्टाचारजी व अन्य काहींनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मान्य करून ‘एमएमआरसीएल’ विरोधात केलेल्या याचिकेवर आज अंतिम निर्णय सुनावण्यात आला. त्यानुसार आजच्या अंतिम निर्णयात आरे मेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे आणि सरकारला सुद्धा दिलासा मिळाला आहे.

Bombay high court denied the petition filed against mumbai Aarey car shade