मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मोदींच्या विनंतीला सपशेल नकार दिल्याने पंतप्रधान मोदींना राजकीय धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला आंतरराष्ट्रीय नैतृत्व म्हणून प्रदर्शन करण्याचा त्यांचा अप्रत्यक्ष हेतू सुद्धा धुळीस मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारताने भारताने काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा तीव्र विरोध झुगारून रशियाकडून एस-४०० हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी आणि इराणकडून तेलाची आयात केल्याने डोनाल्ड ट्रम्प भारतावर प्रचंड नाराज आहेत. यामुळे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताकदिनी भारतात येणार नसल्याचे पत्राने कळविले आहे.

भारताच्या प्रजासत्ताकदिनी अमेरिकेत अनेक राजकीय कार्यक्रम आणि स्टेट ऑफ यूनियनला डोनाल्ड ट्रम्प संबोधित करणार असल्याची कारणं अमेरिकन प्रशासनाने पुढे केली आहेत. मात्र, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनावेळी सर्व कार्यक्रम, जबाबदाऱ्या बाजुला ठेवून मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेन्द्र मोदींचे निमंत्रण अशावेळी नाकारल्याने त्यामागील रशिया आणि इराण देशांसोबत भारताचे आर्थिक व्यवहार कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

मुख्य म्हणजे पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणूक होणार आहे. परंतु तत्पूर्वी जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यास त्याचा राजकीय फायदा सत्ताधारी भाजपला पर्यायाने मोदींना होणार होता. परंतु, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाने लोकसभा निवडणुकी पूर्वी मोदींच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे.

president of america donald trump rejects pm narendra modis invitation of 26th january guest