10 May 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शेतमजुराच्या मुलीची सी.ए. होण्याची इच्छा, मनसे करणार तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च

अमरावती : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्यादरम्यान धामणगाव गढी (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील कु.एेश्वर्या तोटे या विद्यार्थीनीची कैफियत ऐकून घेतली होती. एेश्वर्या तोटे ही सध्या बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, परंतु शेतमजूर असलेल्या आई-वडिलांची मुलगी असलेल्या या मुलीची सी.ए. होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती तीच सी.ए. होण्याचं पुढचं स्वप्नं पूर्ण करून शकत नाही, हे राज ठाकरेंना तिच्याशी संवाद साधताना ध्यानात आहे.

विशेष म्हणजे एेश्वर्या तोटे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे काम करणारी आणी बी.कॉम च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली धामणगाव गढी (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील आहे. परंतु संपूर्ण विषय समजून घेतल्यावर राज ठाकरेंनी तिला सी.ए. होण्याकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसेच मनसेकडून तिच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जवाबदारी घेण्याची हमी दिली.

पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी एेश्वर्या तोटे हिच्याशी संवाद साधून तिच्या आर्थिक अडचणी आणि स्वप्नं समजून घेतली आणि “तू तुझ्या शिक्षणाची काळजी करु नकोस, मनसे पक्षातर्फे तुझ्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्यात येईल, तू आता फक्त शिक्षणाकडे लक्ष दे” असं म्हणताच एेश्वर्याचे डोळे पाणावले होते. दरम्यान, दौऱ्यात राज ठाकरेंच्या या संवादाने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मनसेकडे आकर्षित झाल्याचे वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या