18 November 2019 12:22 AM
अँप डाउनलोड

राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विहिंप'ची काँग्रेसला ऑफर

नवी दिल्ली : सलग ५ वर्षे एकपक्षीय असे बहुमताचे केंद्र सरकार चालवून सुद्धा भाजप’ला अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर मार्गी लावता आलेला नाही. भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संताप आणि संशय निर्माण करणारं वातावरण निर्माण झाल्याने या संघटना आता मंदिराबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.

दरम्यान अयोध्येतील बहुचर्चित आणि प्रलंबित राम मंदिराच्या प्रश्नावर सुरुवातीपासून पुढाकार घेणाऱ्या विहिंप’ने या मुद्द्यावरून थेट काँग्रेसला दिलेली ऑफर सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यानुसार आगामी लोकसभेच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विहिंप’कडून देण्यात आली आहे.

विहिंप’चे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमारा म्हणाले की, ”राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबतही विचार करू. त्यांनी RSS’च्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली सुद्धा बंदी मागे घ्यावी. कारण केवळ जानवे परिधान करून हे होणारे नाही.”

हॅशटॅग्स

#Congress(295)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या