6 May 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

मराठवाड्यासाठी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर : सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आज अखेर मराठवाड्यासाठी विविध धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून सकाळी ८.४० च्या सुमारास जायकवाडी धरणासाठी ४२५० क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तर मुळा धरणातून ६,००० क्युसेक्सक इतके पाणी सोडण्यात आले असे प्रश्नाने कळवले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ पसरला असला तरी तिथल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतून प्रचंड विरोध होत होता. त्यात अनेकांनी थेट आंदोलन पुकारून प्रसंगी जलसमाधी सुद्धा घेण्याचा इशारा काही नेत्यांनी प्रशासनाला दिला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर ९ टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे हे नक्की झाले.

दरम्यान, पाठबंधारे खात्याकडून मुळा धरणातून जायकवाडीसाठी आज सकाळी ९ वाजता ६,००० क्युसेक्सकने ११ दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले आहे. दुपारी २ वाजता ८,००० तर रात्री १२ वाजता १२,००० क्युसेक्सकने पाणी सोडण्यात येणार आहे असे वृत्त आहे. दरम्यान, पाणी सोडण्याआधी ३ वेळा भोंगा वाजवून गांवकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी कळ दाबून नदी पात्रात पाणी सोडले. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ३ दिवसात १ हजार ९ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच या धरणाची साठवण क्षमता २६,००० दलघफू इतकी आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x