29 March 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार?
x

बुडत्या जहाजाची जाणीव? खासदार कपिल पाटील भाजपला रामराम करत काँग्रेसवासी होणार?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. ठाणे भिवंडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील हे सध्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यात स्वतः कपिल पाटील यांनीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तब्बल ३ वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

त्यामुळे सध्या भाजपमध्ये अनेक नाराज असलेली आमदार आणि खासदार मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या संपर्कात असल्याचे समोर येते आहे. दरम्यान, काँग्रेसने भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्यांना हेरून ठेवतानाच सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांना ‘वेट अँड वॉच’ असं धोरण स्वीकारलं आहे.

परंतु, लोकसभा निवडणुका केवळ ४-५ महिन्यावर आल्या असताना भाजपसाठी यासर्व राजकीय घडामोडी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरू शकतात. दरम्यान, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव अनुभवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने सुद्धा सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कारण सध्या दोन्ही पक्षांदरम्यान जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. परंतु, देशभरात भाजपविरोधात वातावरण तापू लागल्याची चुणूक भाजप नेत्यांना सुद्धा लागली आहे. त्याची विशेष झलक पाहायला मिळाली ती ३ हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवणुकीदरम्यान आणि त्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशातील शेतकरी, कामगार, दलित आदी वर्ग भाजप सरकारवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून आलेले भाजपमधील अनेक खासदारांना आपण पुन्हा खासदार होऊ की नाही याची शाश्वती वाटत नाही आणि त्यामुळेच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x