7 May 2025 2:42 PM
अँप डाउनलोड

अमित शहांना मुस्लिम मुक्त देश हवा, ओवेसीचं वक्तव्य

हैदराबाद : तेलंगनात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यरोपांच्या मलिका सुरु झाल्या आहेत। त्यामुळे आजच्या सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की , “भाजपला एमआयएम मुक्त नाही तर मुस्लिम मुक्त देश हवा आहे. त्यामुळे भाजपला काही करून तेलंगणात विजय मिळवायचाच आहे, असं ओवेसी म्हणाले.

तेलंगणातील बहादूरपूर येथील प्रचार सभेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार हा भारतीय घटनेने दिला आहे. भाषणादरम्यान त्यांनी भाजप, काँग्रेस आणि तेलगू देसम या तिन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. तेलंगणात काँग्रेस, तेलगू देसम आणि भाजप यापैकी कोणाचीही सत्ता आल्यास इथलं सरकार हे दिल्ली, आंध्र प्रदेश आणि नागपूर येथून नियंत्रीत केले जाईल असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केले.

ओवेसींच्या पक्षाचे सुद्धा तेलंगणात चांगले बस्तान बसले असून सध्या त्यांचे तेलंगणात ७ आमदार आहेत. दरम्यान, विधानसभेच्या सर्व ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, तसेच मतमोजणी ११ डिसेंबरला पार पडले असे निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या