1 May 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या.....अन्यथा!, मनसे मैदानात

कल्याण : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात प्रदर्शित झालेल्या “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर”या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात सलग सुट्ट्यांमुळे ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटट पाहण्यासाठी कल्याणमधील सिनेमॅक्स येथे गेलेल्या प्रेक्षकांचा पूर्ण हिरमोड झाला आहे. दरम्यान, उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये दिवसभरात केवळ एकच शो देण्यात आला आहे. आणि तो सुद्धा भर दुपारी ३ वाजताचा. परंतु, प्रेक्षकांचा पूर्ण भ्रमनिरास करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे सिनेमॅक्समध्ये शो जास्त ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळे चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘आणि…काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्राइमटाइममधील शो द्यावा, अन्यथा थेट खळ्ळ खटॅक करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण येथील शहराध्यक्ष कौसुत्भ देसाई यांनी दिला आहे.

फ्लॉप ठरलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या हिंदी चित्रपटाने संपूर्ण वेळ व्यापल्याचे निदर्शनास येताच मनसेचे कल्याणमधील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी कल्याणमधील सिनेमॅक्स व्यवस्थापनाला भेट देऊन थेट इशाराच दिला आहे. तुम्ही प्रेक्षकांचा उत्तर प्रतिसाद लाभत असलेल्या प्राइमटाइम’मध्ये “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर” या मराठी चित्रपटाच्या शोला स्थान द्यावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशाराच व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. आता सिनेमॅक्स ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाचे शो वाढवणार का, याकडे मराठी सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x