3 May 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

अयोध्या अर्थात उत्तर प्रदेशातील हिंदी भाषणासाठी उद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी?

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. दरम्यान, या दौऱ्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख कामाला लागले आहेत. शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराचा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हिंदीतील भाषणा दरम्यान भाजपाला देशभर अडचणीत आणण्यासाठी योग्य संदेश हिंदी भाषेत जाणे गरजेचे आहे, हे माहित असल्याने त्यांनी भाषणासाठी हिंदीची शिकवणी सुरु केल्याचे वृत्त ‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केले आहे.

देशभर हिंदीत संदेश देण्यासाठी आणि मोदी सरकारवर तोफ डागण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विशेष तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत तब्बल एका तासाचे भाषण करणार आहेत असे समजते. त्यासाठीच अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत हे याआधीच दसरा मेळाव्यात नक्की झालं आहे.

त्यामुळे राजकीय कारकिर्दीत ते पहिल्यांदाच हिंदी पट्ट्यात भाषण करणार असल्याने उद्धव ठाकरे त्यांच्या हिंदी भाषेतील भाषणात नेमकं काय बोलणार, याकडे प्रसार माध्यमांचं लक्ष लागलं आहे. तसेच शिवसेनेकडून याआधीच उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली असून खासदार संजय राऊत यांच्याकडे विशेष जवाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदी येत असली तरी त्यांचा मराठी भाषणाचा अनुभव मोठा आहे. परंतु, हिंदीतील धारदार शब्दांचा भाषणादरम्यान प्रयोग करून मोदी सरकारच्या राजकीय अडचणीत भर टाकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x