2 May 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मातीत राबणारा बळीराजा मुंबईत, तर सत्ताधीश हेलिकॉप्टरने मातीचा कलश घेण्यासाठी शिवनेरीवर

मुंबई : राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे. दरम्यान, झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी ठाणे, पालघर पासून ते थेट भुसावळ जिल्ह्यातील बळीराजा आणि आदिवासी समाज एकवटला आहे.

तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ढोल ताशाच्या गजरात हेलिकॉप्टरने शिवनेरीवर मातीचा कलश घेण्यासाठी पोहोचले आहेत. येत्या २४ आणि २५ तारखेला उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा मूळ उद्धेश हा लोकसभेच्या तोंडावर केवळ धर्माचं राजकरण करणे हाच आहे, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. सत्ताधारी सध्या धार्मिक मुद्यांवर केंद्रित झाले असून दुष्काळाने ग्रासलेला बळीराजा पूर्णपणे बाजूला पडला आहे. वास्तविक ग्रामीण महाराष्ट्रात दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. परंतु, भाजप-शिवसेना सरकार सध्या धर्म आणि नामांतराच्या राजकरणात मूळ गंभीर विषयांपासून सामान्यांना विचलित करत आहेत, असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x