3 May 2025 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

उद्धव ठाकरे कुटुंबीय आज विशेष विमानाने अयोध्येला रवाना होणार

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.

दरम्यान, याआधीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने २ दिवस आधीच रवाना झाले होते. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच्या कुटुंबासह एका विशेष विमानाने अयोध्येत दाखल होणार आहेत. नाशिकहून जवळपास ३१ तासांचा मोठा प्रवास करुन अनेक कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत.

आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर असे सर्वजण एका विशेष चार्टर्ड विमानाने सकाळी अकरा वाजता मुंबईहून अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान आज ते दुपारी २ च्या सुमारास फैजाबाद विमानतळावर आगमन करतील असं वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या