7 May 2021 8:41 AM
अँप डाउनलोड

शहाणपण सुचलं | केंद्र सरकारने रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली

Remdesivir injections, Corona Pandemic

नवी दिल्ली, ११ एप्रिल: वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता देशातील रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांमधून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. एकीकडे महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र या इंजेक्शनचं मोफत वाटप सुरू असल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका देखील केली आहे.

 

News English Summary: Export of injection Remdesivir and Remdesivir Active Pharmaceutical Ingredients (API) prohibited till the COVID19 situation in the country improves says Government of India.

News English Title: Export of injection Remdesivir injections is prohibited from India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1344)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x