11 May 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक
x

विधानसभा उपाध्यक्ष: डिसेंबरमध्ये सत्ता सोडणार होते, पण नोव्हेंबरमध्ये अजून एका पदावर दावा

मुंबई : दसरा-दिवाळी असे महत्वाचे सण संपताच म्हणजे डिसेंबरमध्ये शिवसेना सत्ता सोडणार असे खासदार विनायक राऊत काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आणि भाजप सोबत युती नाही म्हणजे नाही, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने डिसेंबर सुरु होण्याच्या एक दिवस आधी विधानसभेच्या उपाध्यक्ष जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार विजय औटी यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. जवळपास ४ वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदावर शिवसेनेचे औटी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच युती टिकवण्यासाठी भाजपने शिवसेनेला गाजर दाखवल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे. भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला गळ टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आगामी निवडणुकीत सुद्धा शिवसेना स्वतंत्र लढण्याचे सांगत असली तरी भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहिर केलेल्या महामंडळ अध्यक्षांच्या निवडीत शिवसेनेला स्थान दिले होते. त्यामुळे ही आगामी निवडणुकीत युतीसाठी आणि युतीदरम्यान अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना स्वतःच जाणीवपूर्वक प्रयत्न तर करत नाही ना अशी चर्चा रंगली आहे.

सध्या दोन्ही पक्षांच्या बलाबलाचा विचार केल्यास विधानसभेत भाजपकडे १२३ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. बहुमत युतीच्या बाजूने असल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x