लखनौ : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील विवाह सोहळ्यांवरच अधिकृत बंदी आणली आहे. २०१९ मधील जानेवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत जर स्थानिक लोकांनी विवाह मुहूर्त काढला असेल तर तो बदलावा असे थेट आदेश आहेत. कारण, याच कालावधीत कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी योगी सरकारने तडकाफडकी आदेश जारी केले आहेत.

प्रयागराज या नियोजित ठिकाणी जानेवारी ते मार्च महिन्यात जर कुणी विवाह सोहळ्यासाठी हॉल बुकिंग केले असेल वा इतरही कोणत्या कौटुंबिक किंवा सामूहिक कार्यक्रमाचे ऍडव्हान्स बुकिंग केलं असल्यास त्या सर्व नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. योगी सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर ‘प्रयागराज’ सोडून दुसऱ्या शहरात लग्न करण्यास स्थळ शोधावं असं सांगण्यात आलं आहे.

योगी सराकारने अधिकृतपणे जारी केलेल्या आदेशाप्रमाणे, कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या एकदिवस आधीच आणि एक दिवस नंतर विवाह समारंभास परवानगी नाकारण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंबीयांची धावपळ सुरु झाली आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाने लेखी आदेशाची प्रत सर्व हॉटेलचालक आणि विवाह सोहळ्यासाठी हॉल सुविधा देणाऱ्या मालकांना धाडली आहे. इतकंच नाही तर १५ डिसेंबर २०१८ ते १५ मार्च २०१८ या कालावधीत गंगा नदीला पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आणि सर्वच स्थानिक चर्म उद्योग बंद ठेवण्याचे लेखी आदेशी योगी सरकारने दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ban marriage between january march from yogi government and orders issued