3 May 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पालघर-जळगाव-सांगली-मुंबई हाऊसिंग को-ऑपरेटिव्हच्या सलग पराभवानंतर नगर पालिकेत शिवसेना मोठा पक्ष

नगर : नगर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न भंग झालं आहे. दरम्यान, आजच्या निकालाअंती अहमदनगर महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी एकूण २४ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी द्वितीय क्रमांकावर असून त्यांनी एकूण १४ जागा जिंकल्या आहेत. असं असलं तरी धुळे महापालिकेवर एकहाती सत्ता खेचून आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नगर मध्ये अपयशी ठरले आहेत. कारण भाजपच्या पदरात केवळ १४ जागा [पडल्या आहेत.

तर काँग्रेस पक्षाला केवळ पाच जागांवर स्थिर व्हावं लागलं आहे आणि त्यामुळे नगरमधील काँग्रेस नेत्यांची विरोधी भूमिका विरोधकांच्या पथ्यावर पडल्याचे म्हटले जात आहे. असं असलं तरी निकालाअंती एकही पक्षाला बहुमत न मिळू शकलेलं नाही आणि त्यामुळे सध्या इथे निकालाअंती त्रिशंकू अवस्था आहे.

त्यामुळे नक्की कोणत्या पक्षाचा महापौर महापालिकेच्या सिंहासनावर विराजमान होणार ते पाहावं लागणार आहे. दरम्यान, स्वबळाची भूमिका घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत युती करणार ते पहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x